kalimah.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

vaibhav santosh naik - navarich bashing كلمات أغنية

Loading...

नवरी बाईला शोभे बाशिंग आज
खाडीची चोळी जरीची साडी
सोन्याचा चमके साज
नवरी बाईला शोभे बाशिंग आज

जाईच फूल ते फुलाव वनात
वाढली तशी आईच्या घरात
लाडाची मैना काचेचा आईना
डोळ्यात मईना लाज
नवरी बाईला शोभे बाशिंग आज

आईच्या खुशीत बाबांच्या सावलीत
रमलीस तू बालपणी भातुकलीच्या खेळात
अशी ही आठवण मनात साठवून
सोबत नेईल आज
नवरी बाईला शोभे बाशिंग आज

शृंगार करूनी पाहते नवऱ्याची वाट
घेउनी जाईल बेंड बाज्याच्या गजरात
सोन्याचा साज गालावरी लाज
पोरी सासरी जाणार ही आज
नवरी बाईला शोभे बाशिंग आज

मंगल मांडपी अक्षता पडत
आशीर्वाद द्यायला जमले लोक मंडपात
मंगलाष्टके सुरात वाजती
होतोय हा गाजावाज
नवरी बाईला शोभे बाशिंग आज
जाणार सासरी आलीय वरात
अश्रू हे थांबेना आईच्या डोळ्यात
मायेची ममता प्रेमाची नमता
घेऊन जाईल आज
नवरी बाईला शोभे बाशिंग आज

كلمات أغنية عشوائية

كلمات الأغنية الشائعة حالياً

Loading...