kalimah.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

bhimrao panchale - tujha tasach godva...aselahi كلمات الأغنية

Loading...

तुझा तसाच गोडवा, असेलही. नसेलही
तसा उन्हांत गारवा, असेलही. नसेलही.

अजून रोज हिंडते, नभांत एक पाखरू
उदास तोच पारवा, असेलही. नसेलही.

निवांत एकटाच मी, निवांत ही तुझी नशा
तुझ्या स्वरांत ‘मारवा’, असेलही. नसेलही.

किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती
हवी तशीच ही हवा, असेलही. नसेलही.

كلمات أغنية عشوائية

كلمات الأغاني الشهيرة

Loading...