kalimah.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

asha bhosle - sainik ho tumchyasathi كلمات الأغنية

Loading...

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी

वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी

आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुन या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी

उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणास घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी

كلمات أغنية عشوائية

كلمات الأغاني الشهيرة

Loading...